जगासाठी तू कुणीतरी असशील पण माझ्यासाठी तू सारं जग आहेस तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वस्व.
धरती आकाशासाठी सूर्य प्रकाशासाठी तू फ़क्त माझ्यासाठी तू सारं जग आहेस तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वस्व.
पोर्णिमेच्या रात्री चांदण्याचा सडा देशील का मला मौनिचा घडा जीवनात असलीस तर गैरसमज कधी करु नकोस आपल्यात भांडाण झालं तर मैत्री कधी विसरु नकोस.
निसर्गाला रंग हवा असतो फ़ुलाला गंध हवा असतो व्यक्ती ही एकटी कशी राहणार तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो.
तारे तर चमकत सारेच आहेत त्यातील चांदणी आहेस तू एक मैत्री तर सगळेच करत आहेत परंतु निभवत आहेत कोणीतरी
मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासा.मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब.मैत्री म्हणजे दोन जीवनामधला सेतू.मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.
मैत्री म्हणजे आभाळाला पडलेले स्वप्न.मैत्रीम्हणजे नवरत्नांच्या हारामधील रत्न.मैत्री म्हणजे वेलीवर असलेले फ़ूल.मैत्री म्हणजे दोन मन जोडणारा सेतू.मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.
चंद्राला जशी चांदण्याची साथ समुद्राच्या लाटांना किना-याची साथ मला हवी आहे तुझ्यासारख्या मैत्रीची साथ.
मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे.
१० पवित्र हे माझे प्रेम अर्थ वेगळा काढू नकोस उठता बसता आठवण येते ती हिरावून घेऊ नकोस उत्त्र मजला देशील का.....माझ्याशी मैत्री करशील का ?
११ मैत्री........नको फ़ुलासारखी - क्षणभर सुगंध देणारी नको सूर्यासारखी-सतत तापलेली नको सावलीसारखी-कायम पाठलाग करणारी मैत्री....हवी अश्रूं सारखी सुख-दुःखात समान साथ देणारी.
१२ तुझ्या मैत्रीबद्दल लिहिताना शब्द फ़िके पडतात आणि बोलायला गेलं तर भावना ओठाशी अडतात.
१३ तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शितलता असावी चांदण्यासारखी आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
१४ मैत्री ही एक फ़ुलाप्रमाणे असते ती फ़ुलवावी तशी फ़ुलते पण त्या फ़ुलाच्या पाकळ्या गळू न देणे आपल्या हातात असते.
१५ मैत्रीत तुझ्या बहरलेली प्रीत आहे मैत्रीत तुझ्या मधुर असे गीत आहे मैत्रीत तुझ्या जीवेनाची रीत आहे म्हणूनच तू माझी मनमित आहे.
१६ मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फ़क्त तुमची आणि माझी.
१७ माणसाने स्वप्ने पाहावीत,भरभरुन पाहावीत परंतु स्वप्नपूर्तीची गळ मात्र घालू नये कारण्पाणी कितीही उथळ असेल तरी ती पार बुडून जातात आणि उरते फ़क्त एकटेपण.
१८ एक भाषा अशी आहे ना लिपी,ना शब्द,ना उच्चार,ना स्वर,आपल्यालाच त्याची जाणीव आहे आपलीच मैत्री हेच खरं विश्व आहे तुझी आणि माझी मैत्री अशी असावी,काटा तुला टोवला तरी,कळ मला यावी !
१९ तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी,कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी मी आनंदात असताना हसू तुझे असावे,तू दुःखात असताना आसू माझे असावे,मी एकाकी असताना सोबत तुझी असावी,तू मूक असताना शब्द माझे असावे.
 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved